Home स्टोरी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

80

सिंधुदुर्ग: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या ते घरातच विलगीकरणात आहेत. हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत ते भाग घेणार होते, तथापि कोरोना झाल्यामुळे त्यांचे पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राजनाथ सिंह यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली असून पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी बुधवारी आर्मी कमांडर्स परिषदेत सहभाग घेतला होता. तर गुरुवारी ते हवाई दल कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. आर्मी कमांडर्स परिषदेस लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.