Home क्राईम दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात.

दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात.

199

वेंगुर्ले प्रतिनिधी: दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या रेडी येथील महिलेला वेंगुर्ले पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई वेंगुर्ले-शिरोडा मार्गावर मोचेमाड पुला नजीक रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वैशाली प्रकाश आसोलकर (३५) रा. सुकळभाटवाडी, असे संशयित महिलेचे नाव आहे. यावेळी तिच्याकडून २० हजार रुपये किमतीचा ६३६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

 

संबंधित महिला गांजा घेऊन विक्री करण्यासाठी वेंगुर्लेच्या दिशेने जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी मोचेमाड पुला नजीक सापळा रचला होता. ती महिला पुला नजीक M H 07 A E 0339 या दुचाकी वरून आली आणि अणसुर तीठ्या नजीक थांबली असता पोलिसांनी धाड टाकून तिची चौकशी सुरू केली. यावेळी तीची तपासणी केली असता तिच्या जवळ ६३६ ग्रॅम वजनाच्या एकूण अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे दिसून आला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास म. स. पो. नि. श्रीम. विद्या जाधव करीत आहेत.