Home क्राईम दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात!

दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात!

841

सावंतवाडी:  तालुक्यातील आरोस मधलीवाडी येथील संदेश देऊलकर यांच्या घरासमोरिल दुचाकी चोरून घेवून जात असताना येथील जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन एक युवक आणी एका युवतीला दि. २२ ऑगस्ट दिवशी पहाटे ४ वाजता पकडले. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना संपर्क केल्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही संशयिताना कह्यात घेवून वैद्यकीय तपासणीकरीता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून आले. दोन्ही संशयिताकडे चौकशी केली असता या युवकाने सावंतवाडी हुसेन मुजावर तर युवतीने आपले नाव वेदिका देसाई असे सांगितले आहे. सदर युवती गरोदर असल्याचे तपासणी दरम्यान निदान झाले आहे. मात्र हि नावे खरी की खोटी आहेत याविषयी पोलिसांना संशय आहे.

दुचाकी चोरांना पकडल्याची बातमी समजतात आरोस परिसरात पसरल्यावर याच परिसरातील धोंडू गाळेलकर यांची आणखीन एक दुचाकी स्पेंडर आजच्या रात्री चोरीला गेल्याची घटना घडली असल्याचे सांगितले आहे. यामुळे अजून पकडलेल्या चोरांची दुचाकीची चोरीची टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पोलीस हवालदार एस. एन. टाकेकर, पोलीस कॉन्स्टेबल एस. आर. पाटील पुढील तपास करत आहेत.