Home स्टोरी दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तक...

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तक पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्नेहभेट

93

सावंतवाडी: प्राथमिक स्तरावरील बालकांना सहज सोप्या पद्धतीने समजून येईल, अशा पद्धतीच्या विज्ञानातील प्रयोगांची सोपी मांडणी आदर्श प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी आपल्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या पुस्तकात मांडली आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे अध्ययन केल्यावर बाल संशोधक तयार होतील. बालकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होईल, अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे. म्हणून अशाच पद्धतीचे विज्ञान शिक्षण मनोरंजनातून विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्या संशोधनवृत्तीत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे शालेय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

 

जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त, सरमळे शितप शाळा येथील प्राथमिक शिक्षक दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तक पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्नेहभेट देण्यात आले.

यावेळी युवा नेते संदीप गावडे व लेखक दत्ताराम सावंत उपस्थित होते.

 

दरम्यान दत्ताराम सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ पुस्तकात विज्ञानावर आधारित 14 प्रयोग समाविष्ट केले आहेत. स्वतः शिक्षक सावंत यांनी तब्बल वीस वर्षे विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरापर्यंत मजल मारली असून त्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून विविध पारितोषिके मिळविले आहेत. विज्ञानाचे एक प्रयोगशील शिक्षक म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यात परिचित आहेत. विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोग कसे करता यावेत, यासाठी मनोरंजनातून विज्ञान शिकविण्यात दत्ताराम सावंत यांची ख्याती आहे. या पुस्तकाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते संदीप गावडे यांनी शुभेच्छा दिल्या असून प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच राज्यस्तरावर काम करणारे विविध विज्ञान शिक्षक यांनी देखील शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.