Home स्टोरी द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा...

द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा प्रेक्षकांनी षड्यंत्राकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन!

69

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट एक ‘अजेंडा’ (धोरण) आहे’, असे नसून चित्रपटात दाखवलेली वस्तूस्थिती कशी दाबायची ?, हाच याला विरोध करणार्‍यांचा अजेंडा आहे, असे मला वाटते. त्यामुळे प्रेक्षकांनी या लोकांच्या षड्यंत्राकडे आणि चित्रपटावरून निर्माण केलेल्या वादाकडे लक्ष देऊ नये. आम्ही या चित्रपटासाठी संशोधन करत असतांना आम्हाला शेकडो मुली भेटल्या, ज्यांचे फसवणूक करून धर्मांतर करण्यात आले आहेत. मग या चित्रपटाला बनावट कसे म्हटले जाते? प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टीकोन असतो; पण आम्ही सत्याच्या पाठीशी उभे आहोत, असे परखड मत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निमाते विपुल अमृतलाल शहा यांनी ‘एबीपी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.द केरल स्टोरी’ या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला विरोधही होत आहे. त्याविषयी शहा यांना विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील मत व्यक्त केले. हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित होणार आहे.शहा पुढे म्हणाले की,१. हा चित्रपट ३ मुलींच्या सत्यकथेवर आधारित आहे. जर ही ३ मुलींची कथा असेल, तर तो ‘अजेंडा’ कसा असू शकतो ? याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग आणि वाक्य सत्य आहे.२. हा चित्रपट बनवण्याची कल्पना कुठून आली ? या प्रश्‍नावर शहा म्हणाले की, माझ्याकडे एक दिग्दर्शक आहे, त्याने ३ वर्षांपूर्वी माझ्यासाठी संहिता आणली होती. यावर पुष्कळ संशोधन करून त्यावर माहितपट बनवला. त्यानंतर आम्ही पुन्हा संशोधन केले. वर्षभर संशोधन केले, जेणेकरून आमच्या लिखाणात खोटेपणा नसेल. हा प्रश्‍न आपल्या देशाच्या मुलींचा आहे, त्यामुळे आम्हाला असे काही करायचे नव्हते की, लोक म्हणतील की, असे कधी घडलेच नाही. आमची संहिता पूर्ण झाल्यावर आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्हाला ३ वर्षे लागली.