सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो. ‘द केरल स्टोरी’ला मिळालेल्या यशानंतर मी विश्रांती घेऊ इच्छित नाही. हा चित्रपट बनवण्यास मला ७ वर्षे लागली. मला ठाऊक होते की, हा चित्रपट यशस्वी होणार आहे.