सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या २०२३-२०२६ कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी आज शनिवार दि. ११ मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय येथे मतदान प्रक्रिया सुरुवात झाली. आतापर्यंत ५७० हून अधिक जणांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास सहाशेहून अधिक वकील मतदार आहेत. मतदानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे . त्यानंतर मतमोजणी सुरुवात होणार आहे .सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया होत असून अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, अशा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. अध्यक्षपद व सहसचिव पदासाठी चार तर अन्य पदांसाठी प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात आहेत, सायंकाळी पाच नंतर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे.