Home स्टोरी तुळस गावात राज्याच्या बाहेरील लोकांचे वास्तव्य आणि संशयास्पद वागण्याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे...

तुळस गावात राज्याच्या बाहेरील लोकांचे वास्तव्य आणि संशयास्पद वागण्याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष…!

301

ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत गजानन मराठे २६ जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण

 

वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात वेशीवाडीत काही महिन्यांपासून राज्याच्या बाहेरील काही अनोळखी लोकं येऊन राहिली आहेत. या लोकांपासून कित्येक महिने गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या लोकांची वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायतिने याबाबत कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. हे व्यक्ती गावातील जंगलात जाऊन सरपटणारे प्राणी, रानडुक्कर, माकड आणि अन्य प्राण्यांची शिकार करून तस्करी करत असल्याचा संशय आहे. तसेच जंगलातील औषधी झाडांची ही तस्करी करत असल्याची संशयात पद माहिती आहे.

ग्रामपंचायतीला दिलेलं पत्र

याबाबत वेळोवेळी प्रशासनाला तसेच ग्रामपंचायतीला माहिती देऊन ही या लोकांबाबत कोणतीही कारवाई ग्रामपंचायत कडून तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे व्यक्ती कुठून आले? नेमका व्यवसाय काय करतात? याबाबत कोणतीही माहिती ग्रामपंचायत घेताना दिसत नाही. सहाजिकच या बाहेरून आलेल्या लोकांमुळे गावातील राहणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. विशेषतः शाळेपासून गावातील घरं दूर असल्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले डोंगर भागातून ये जा करतात. अशा वेळी लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. अशी शंका या गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी बाहेरून आलेल्या या लोकांची योग्य ती माहिती ग्रामपंचायतिने घ्यावी आणि या लोकांवर वेळ आल्यास योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे करूनही ग्रामपंचायत आणि प्रशासन कोणतेही योग्य पाऊल उचलत नसल्यामुळे गावातील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत गजानन मराठे यांनी तुळस गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शाळेतून घरी ये जा करणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी येत्या २६ जानेवारीला आमरण उपोषण करण्याचे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत अवधूत गजानन मराठे यांनी योग्य ते कागदपत्र प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला दिलेले आहेत.