Home स्टोरी तुळस कुंभारटेम्ब येथील पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करा! नारायण...

तुळस कुंभारटेम्ब येथील पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करा! नारायण कुंभार

349

१४ जुलै वार्ता: तुळस कुंभारटेम्ब येथे पिसाळलेल्या कुत्र्याने काही लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात काही लोकं जखमी झाले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याने काही जनावरांना, पाळीव कुत्र्यांवरहि हल्ला केला. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांच्या समजली असता त्यांनी तात्काळ लसीकरण रेबीज हॉटलाईनचे अधिकारीअमित नाईक यांच्याशी संपर्क केला व त्यांची टिम बोलावून घेतली. लसीकरण रेबीज हॉटलाईनची टिम आणि तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांनी पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडून त्या कुत्र्यांवर उपचार सुरु केले आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्यांपासून ज्या लोकांना विजा झाली आहे, त्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सामाजिक कर्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांच्या प्रयत्नामुळे तुळस कुंभारटेम्ब येथील पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांचे आभार मानले आहेत. अशा भटक्या कुत्र्यांचा आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी आपण प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांनी दिली आहे.