Home स्टोरी तुळस काजरमळी एसटी बस सुरू करा! नारायण कुंभार यांची मागणी…

तुळस काजरमळी एसटी बस सुरू करा! नारायण कुंभार यांची मागणी…

210

वेंगुर्ला: सावंतवाडी येथून वेंगुर्ला तुळस काजळमळी मार्गे संध्याकाळी ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान जाणारी एसटी बस पूर्ववत सुरू करण्यात यावी. ही एसटी बस फेरी बंद असल्याने शालेय मुलांच्या शैक्षणिक दृष्टीने नुकसान होत आहे. त्यामुळे बाबत तात्काळ कार्यवाही करून महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मच्छिमार नेते वसंत तांडेल, युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य मनोहर तांडेल आदी उपस्थित होते.