Home स्टोरी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेसकोडबाबत महत्वाचे नियम लागू!

तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेसकोडबाबत महत्वाचे नियम लागू!

117

१८ मे वार्ता: आज १८ मे रोजी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनच्यावतीने एक नियमावली फलक लावण्यात आला आहे. मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात हे बोर्ड लावण्यात आलेत. मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत. त्या नियमावलीचे फलक हे मंदिराच्या आवारात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.