Home राजकारण तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही? –अजित...

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही? –अजित पवार

185

५ जुलै वार्ता: राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे नेते याची उदाहरणे आहेत. आमच्याकडून कोणती चूक झाली तर सांगा, आमचे कान धरा; मात्र आता वय ८३ वर्षे झाले. तुम्ही कधी तरी थांबणार आहात कि नाही ? तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही ?, असा प्रश्‍न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी त्यांचे नाव न घेता उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाच्या गटाची मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नूतन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो, ही आमची चूक आहे का? प्रत्येकाचा काळ असतो. मनुष्य २५ ते ७५ वयापर्यंत काम करू शकतो; पण प्रत्येकाविषयी असे घडतेच, असे नाही. सोनिया गांधी परदेशी असल्याच्या सूत्रावरून आमचे वरिष्ठ नेते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसला पाठिंबा दिला.’’