सिंधुदुर्ग: व्ही.एन.नाबर स्कूल बांदा येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी झाली आहे.
१)कु. विधी पाटील (१४ वर्षांखालील मुली) – द्वितीय क्रमांक
२)कु. प्रथमेश राणे(१७ वर्षांखालील मुलगे)-द्वितीय क्रमांक
३)कु. भावेश कुडतरकर (१७ वर्षांखालील मुलगे) – चौथा क्रमांक
४)कु.आयुश राठोड (१९ वर्षांखालील मुलगे) -द्वितीय क्रमांक
तसेच पब्लिक स्कूल आंबोली येथे झालेल्या तालुका स्तरीय ज्यूडो स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळून त्यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१)कु.शार्दुल शिर्के (३० किलो खालील वजनी गट )
२) आशिष बांदेकर (४५किलो खालील वजनी गट)
३)कु.वैभवी धुरी (४८ ते ५२ किलो वजनी गट)
४)कु. ओमकार नेसर्गिकर (४८ ते ५२ किलो वजनी गट )
५)कु. यश कुडव (३५ किलो खालील वजनी गट)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.