Home स्टोरी तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा.

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा.

162

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव (Tara Sahdev) ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने (Jharkhand High Court) ८ वर्षांनंतर आरोपी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्या आईला १० वर्षे, तर अन्य एक आरोपी मुश्ताक अहमद याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. रकीबुल हसन (Raqibul Hasan) याने ‘रंजतसिंह कोहली’ (RanjitSingh Kohli) असे नाव सांगून तारा सहदेव हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. नंतर तिचा लैंगिक छळ आणि अत्याचार करत तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला होता.

तारा सहदेव

न्यायालयाच्या निर्णयानंतर तारा सहदेव म्हणाल्या की, मी न्यायालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना धन्यवाद देते. हा न्याय केवळ माझ्यासाठी नाही, तर देशातील प्रत्येक मुलीसाठी आहे. त्यांच्या समवेत असे काही झाले, तर आरोपींना शिक्षा होईल, असा विश्‍वास यामुळे त्यांच्यात निर्माण होईल.