मिंधे-फडणवीस सरकारचा करिष्मा,जिल्ह्यातील एकही परीक्षार्थी गुणवत्ता यादीत नाही…!
दिवस सुरू झाला की रात्री झोपे पर्यँत शिवसेनेवर बोलणारे भाजप चे वाचाळवीर तलाठी परीक्षा घोटाळ्या बाबत गप्प आहेत…!
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी केंद्र यासाठीच नव्हेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो,पाणबुडी प्रकल्पाबाबत युवासेनेसकट अनेक लोकांनी आवाज उठवला आणि नंतर भाजप नेत्यांना घोषणा करावी लागली की प्रकल्प जाणार नाही परंतु निवडणूका झाल्या की हा प्रकल्प जाईल यात शंकाच नाही परंतु महाविकास आघाडी च सरकार आल्यास आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प जाऊ देणार नाही.
तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाला यासंदर्भात अनेक पुरावे देखील दिले परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात पुरावे द्या, प्रवेश शुल्क भरायचं परीक्षा द्यायची अभ्यास करायचा परीक्षा प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून घ्यायची तुम्ही पुरावे जर परीक्षार्थीनी द्यायचे तर हे गृहमंत्री म्हणून फक्त खुर्चीच तापवणार आहेत का ? हा युवासेनेचा सवाल आहे,बर या परीक्षेत गुणवत्ता यादित आलेत ते त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे नातलग,महायुती च्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे नातलग मात्र सर्व सामान्य परीक्षार्थींच्या हाती निराशाच विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही परीक्षार्थीं गुणवत्ता यादित नाही. हे जिल्ह्यातील भाजप चे अपयश आहे,सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम भाजप कडून चालू आहे जिल्ह्यातील मतदार भाजपला येणाऱ्या निवडणूकित जागा दाखवेलच
युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे तलाठी भरती परीक्षा प्रवेश शुल्क परीक्षार्थीं ना परत देण्याची मागणी करणार असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.