Home स्टोरी तब्बल पस्तीस वर्षांनंतर कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८ – ८९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात...

तब्बल पस्तीस वर्षांनंतर कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८ – ८९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

671

सावंतवाडी (कलंबिस्त): कलंबिस्त हायस्कूलच्या १९८८ – ८९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र येत अतिशय उत्साहात कलंबिस्त हायस्कूलमध्ये संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत, सिताराम सुर्वे, माजी शिक्षक शशिकांत धोंड, शरद नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सहकारी शिक्षक शरद सावंत, किशोर वालावलकर, श्रद्धा पराडकर,वरीष्ठ लिपिक विष्णू पास्ते, कनिष्ठ लिपिक रविकमल सावंत, कर्मचारी रोहीत पास्ते माजी शिक्षकेतर कर्मचारी मधुकर नाईक, मधुकर कदम आदी उपस्थित होते.

यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेला हार्मोनियम संगीत वाद्य भेट देण्यात आले. सुमधूर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत शाळा व गुरुजनांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकवृदांनीही आपल्या मनोगतात या विद्यार्थ्यांबद्दलच्या काही स्मृती जागवत कृतार्थता व्यक्त केली. प्रशालेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी असे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे म्हणजे शाळेसाठी प्रेरणादायी व कार्याला उर्जा देणारे ठरतात असे गौरवोद्गार काढून या बॅचने आपल्या ऋणातून उतराई होण्याचा भाग म्हणून प्रशाललेला भेट दिलेल्या हार्मोनियम संगीत वाद्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

या बॅचमधील कृष्णा मेस्त्री यांनी गुरु हाची देव असा भाव व्यक्त करणारे गीत आपल्या सुमधूर आवाजात गाऊन या स्नेहमेळाव्याला रंगत आणली. या स्नेहमेळाव्याला या बॅचचे दिलीप राऊळ, विठ्ठल सावंत, राजेश नाईक, जयंद्रथ कुडतरकर, धोंडीबा सावंत, कृष्णा मेस्त्री, अनिल मेस्त्री, बबिता राजगे, मनिषा सावंत, संजीवनी परब,पुनाजी सावंत, संजय नाईक, सुनील कुडतरकर, बापू राऊळ, राजन राऊळ, सुधाकर राऊळ, चंद्रशेखर नाईक, धोंडी पास्ते, रविंद्र देऊलकर, सुनील राणे, एकनाथ राऊळ, लक्ष्मण पास्ते, बाबाजी सावंत, सहदेव पास्ते,राजन कुडतरकर, संतोष सावंत, सुनील गावडे, प्रमोद मडगांवकर, प्रकाश पास्ते, गणू शां. राऊळ आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी सुनील कुडतरकर यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माजी विद्यार्थी तथा मळगाव इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक विठ्ठल सावंत यांनी केले.