Home स्टोरी तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

135

मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व गुहागर येथील जि प शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर (महाराष्ट्र) दखल घेऊन या संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी सन 2023 ते 2026या कालावधी करिता ही निवड करण्यात आली आहे. संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रमोद सुभाष मोरे यांनी सदरणीवड जाहीर केली आहे.सतीश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य याचे संघटक आहेत तर अध्यक्ष आविष्कार फाऊंडेशन इंडीया तालुका शाखा गुहागर चे अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय पर्यावरण पूरक शिक्षक पुरस्कार २०१७ महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय पर्यावरण मित्र शिक्षक पुरस्कार २०१९ महाराष्ट्र राज्य,राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१, राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्कार २०२१-२२, शैक्षणिक व सामाजिक कार्यगौरव राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२३ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुणगेकर यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.