Home स्टोरी डासांचं जीवनचक्र थांबवा: शिडवणे आरोग्यसेवक गणेश तेली!

डासांचं जीवनचक्र थांबवा: शिडवणे आरोग्यसेवक गणेश तेली!

141

शिडवणे नं.१ शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन….

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): दरवर्षी पावसाळा जवळ आला कि मुलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे आवश्यक असते. शिडवणे उपकेंद्र यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी आरोग्य सहाय्यक प्रवीण भागवत व आरोग्यसेवक गणेश तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले.

आरोग्यसेवक गणेश तेली म्हणाले, ” पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या काळात विविध ठिकाणी पाणी साचून राहते. त्यात डासांची उत्पत्ती होते. यासाठी डासांचे जीवनचक्र थांबवले पाहिजे. आरोग्य यंत्रणेच्या साहाय्याने गप्पी मासे टाकून डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तरीही घराघरात स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शाळेतील एकूण ४९ मुलांनी , ३ शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. मुलांना योग्य वेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये आणि सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि सर्व शिक्षकवृंद यांनी उपकेंद्र शिडवणे यांचे आभार मानले आहेत.