Home राजकारण ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार! खासदार कृपाल तुमाने यांनी...

ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार! खासदार कृपाल तुमाने यांनी केला गौप्यस्फोट

115

२५ मे वार्ता: काल शिवससेनेची बैठक झाली. त्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. “ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.”

ठाकरे गटाचे काही आमदारंही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. ऊर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत इतर पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला. तरी उद्धवजी काही बोलत नाहीत, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.