हडी जेष्ठ नागरीक संघाकडून गुणवंतांचा सत्कार.
मसुरे प्रतिनिधी:
स्वतः बरोबरच तुमचे आई वडील व गावाचे नाव रोशन करा. पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखावे. मोबाइल वाईट नाही परंतु त्यात जास्त गुंतून राहणे धोक्याचे आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिक ही आपली संपत्ती आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. स्वतः बरोबर गावाचा विकास व्हावा यासाठी हुशारीचा वापर करा.
अधिकारी होण्यापेक्षा अनेक क्षेत्र आज करियर साठी उपलब्ध आहेत. अशा संधींचा शोध घ्या व ध्येय मोठी ठेवून मार्गक्रमण करा. अभ्यासा बरोबरच मैदानी खेळ सुद्धा खेळा असे प्रतिपादन मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी हडी येथे केले.
फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवी, शिष्यवृत्ती, शालेय परीक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणगौरव हडी शाळा सभागृहात करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दीप प्रजवलन करून तसेच साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रकाश तोंडवळकर, उपसरपंच भरत लाड, माजी सभापती उदय परब, संघाच्या अध्यक्षा चंद्रकला कावले, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव रमाकांत सुर्वे,मालवण पोलीस कैलास ढोले, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, प्रभाकर चिंदरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, स्वतः कोण होणार याचा निश्चय करा. कठोर परिश्रम करून ध्येय गाठा. जेष्ठां कडून संस्कार आत्मसात करा. यशाला शॉर्टकट नसतो. जेष्ठांचा सल्ला जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतो. जेष्ठ नागरिकांच्या समस्या असल्यास दूर करण्यासाठी मालवण पोलीस विभागाचे पूर्ण सहकार्य राहील. यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले, गावातील विध्यार्थ्यांचा गुणगौरव उत्साहात करण्याचा उपक्रमाबद्दल या संघाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडे होईल. आजोबांनी केलेला सत्कार गुणवंतांनी लक्षात ठेवावा.माजी सभापती उदय परब म्हणाले, जेष्ठ नागरिकांचा उत्साह अनुकरणीय आहे. पाटकर काकांसारखी झटणारी माणसं या संघाला लाभली आहेत. सत्कार मूर्तींनी आजच्या सत्काराची आठवण आयुष्य भर ठेवावी. गावातून अधिकारी निर्माण होणे गरजेचे आहे. यावेळी जल प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सदस्य सौ सुप्रिया वेंगुर्लेकर, सौ प्रज्ञा तोंडवळकर, सौ मनीषा पोयरेकर, सौ सीमा शेट्ये, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, कृष्णा धुरी, जानू कदम, रमेश कावले, गुरुनाथ गावकर, सौ सोनाली कदम, सौ गोसावी मॅडम, सौ राणे मॅडम, गणपत शेडगे, श्री राणे सर आदी उपस्थित होते. विध्यार्थ्यांना बक्षीस साहित्य मंगेश श्रीधर तोंडवळकर यांच्या वतीने देण्यात आले. तसेच मालवण तहसीलदार मॅडम यांचे जेष्ठांना चांगले सहकार्य लाभत असल्या बद्दल संघाच्या वतीने आभार मानण्यात आले. प्रास्ताविक सल्लागार चंद्रकांत पाटकर तर आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.