Home स्टोरी जुनी पेन्शनबाबत निर्मला सीतारामण यांची महत्वाची घोषणा!

जुनी पेन्शनबाबत निर्मला सीतारामण यांची महत्वाची घोषणा!

132

जुनी पेन्शनबाबत निर्मला सीतारामण यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामण सांगितले की, पेन्शन प्रणालीच्या सुधारणेसाठी असा उपाय शोधला जाईल, जो केंद्र आणि राज्ये दोन्ही स्वीकारू शकतात. लोकसभेतील अर्थमंत्र्यांच्या या विधानाने आर्थिक तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण केंद्र सरकार काही राज्य सरकारांच्या वतीने जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्यास सतत विरोध करीत आहे. अशा परिस्थितीत जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे यात बदल केल्यानं फार मोठा आर्थिक भार पडणार नाही.या मोठ्या घोषणेनंतर ६० हून अधिक सुधारणांसह वित्त विधेयक २०२३ लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.समजा तुमचे उत्पन्न ७,००,१०० रुपये म्हणजे तुमचे उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा १०० रुपये अधिक आहे, तर आता फक्त १०० रुपये जास्त असल्याने तुम्हाला २५,०१० रुपये कर भरावा लागत होता. अशा करदात्यांना सरकारने दिलासा दिला आहे. नवीन प्रस्तावानुसार, जर तुमचे उत्पन्न ७,००,१०० रुपये असेल तर त्यांना २५,०१० रुपये कर भरावा लागणार नाही. त्याऐवजी त्यांना फक्त १०० रुपयांवर कर भरावा लागेल. कर तज्ज्ञांनी या गणनेनुसार सांगितले आहे की, ज्या वैयक्तिक करदात्यांचे उत्पन्न ७,२७,७७७ रुपयांपर्यंत आहे, त्यांना या तरतुदीचा लाभ मिळू शकतो.