Home स्टोरी जीवनविद्या मिशनच्या वतीने सावंतवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

जीवनविद्या मिशनच्या वतीने सावंतवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

162
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

सावंतवाडी प्रतिनिधी: रविवार दि. २० जुलै रोजी सावंतवाडी उभा गुंडा येथे डॉ. निलेश अटक यांच्या घरी जीवनविद्या मिशनच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हरिपाठ, नामजप यज्ञ, भलं कर साधना आणि विठ्ठलाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं. यावेळी जीवनविद्या मिशनच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा होती. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जीवनविद्या मिशनच्या वतीने मुंबई गोरेगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कोकणातील नामधारक मुंबईमध्ये उपस्थित होते. त्यामुळे जीवनविद्या मिशनच्या सावंतवाडी वेंगुर्ला येथील नामधारकांना गुरुपौर्णिमा उत्सव कोकणात साजरा करता आला नव्हता. त्यामुळे जीवनविद्या शाखा वेंगुर्लाचे पदाधिकारी व नामदारक यांनी मिळून काल सावंतवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला व सद्गुगुरूंच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाला सद्गुरु वामनराव पै यांच्या खूप जुन्या शिष्य आणि प्रबोधनकार सौ सुनंदाताई चव्हाण या प्रमुख पाहुण्या म्हणून लभल्या. सौ सुनंदाताई चव्हाण यांनी नामधाकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी आणि नामधारक उपस्थित होते.

यावेळी डॉ. निलेश अटक, डॉ. सौ अटक, श्री कुडतरकर, सौ कुडतरकर, श्री म्हाडगुत, चिले परिवार, कल्पना बांदेकर, मनेश नाईक, देवू साईल , पत्रकार प्रसाद परब परिवार,श्री व सौ मिलिंद गावडे, रवींद्र मोचेमाडकर आणि विध्यार्थी नामधारक मोठया संख्येने उपस्थित होते. हरिपाठ आणि भक्तीगीते सादर करतांना समृद्धी चिलेया मुलीने पखवाज वादन आणि श्रद्धा चिले आणि सेजल चिलेया मुलींनी उत्तमरित्या पेटी वादन करत जीवनविद्या मिशनच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची शोभा वाढवली.