Home स्टोरी जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे झोपण्या-बसण्याचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे...

जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचे झोपण्या-बसण्याचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे देणार टेबल्स, ब्लॅंकेट्स व चटया.

163

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे ओरोस येथे शासकीय योजनेतून आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आईला घेऊन गेली असता, तेथे दोन दिवस तिच्या आईला इतर अनेक रुग्णांसोबत ऍडमिट करुन ठेवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत परत पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात गावागावातून रुग्ण येतात. मात्र येथे पेंशटच्या नातेवाईकांना बसण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे रस्त्यावर बसावे लागते, तसेच पेशंटना ब्लँटेस नसल्याचे अत्यंत हाल होत असल्याचे रुपा मुद्राळे यांना दिसून आले. त्यामुळे तिने तिथूनच सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे व रवी जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून येत्या दोन दिवसात आपण काही करून येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 20 टेबल, 20 ब्लॅंकेट व 20 चटया देण्याचे निश्चित केले आहे.

 

सावंतवाडी येथे सोमवार लाईट नसल्यामुळे व उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटर सतत बंद पडत असल्यामुळे येथे गावागावातून येणा-या रुग्णांना खूप हाल सहन करावे लागतात. याचा अनुभव रूपा मुद्राळे व रवि जाधव यांना नेहमीच घ्यावा लागतो रुग्णांच्या सेवेसाठी रूपा मुद्राळे व रवी जाधव हे वारंवार हॉस्पिटलच्या संपर्कात त्यामुळे हॉस्पिटल मधील सर्व परिस्थिती त्यांना माहित आहे लाईट गेल्यानंतर अपघात विभाग व अति दक्षता विभागामध्ये पेशंटला धोका निर्माण होऊ नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयात इन्व्हर्टर बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कम रु.35,000/- मात्र पैकी रुपा मुद्राळे यांनी त्यांच्या आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले रक्कम रु.15,000/- देण्याचे ठरविले आहे.

 

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजपर्यंत सुमारे दीड लाख रुपयांच्या वस्तू दानशूर व्यक्ती यांच्या सहाय्याने रुग्णांच्या सेवेसाठी देण्यात आल्या याचे कारण शासकीय रुग्णालय म्हटलं की येथे गोरगरीबच रुग्ण येतात व त्या रुग्णांना योग्य सोयी सुविधा मिळाव्या त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमी झटत असते व रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असते.

 

संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी रूपा मुद्राळे यांच्या या निर्णयाचे कौतुक करून आपण पण या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊया असे सदस्यांना आवाहन केले