Home स्टोरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांचा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय तर्फे गौरव.

जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांचा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय तर्फे गौरव.

282

सावंतवाडी प्रतिनिधी: ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ अविरत सुरू ठेवणे खूप जिकरीचे आहे. आज पुस्तकी वाचक वर्ग कमी होत चालला आहे अशा स्थितीत नीटनेटक्या पद्धतीने गावागावात उत्तम प्रकारे ग्रंथालय चळवळ सुरू आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग, कुडाळ या सर्वच भागात ग्रंथालय दर्जेदार कार्य करत आहेत. अशा शब्दात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी गौरव उद्गार काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका निहाय गावागावातील ग्रंथालयांची तपासणी व पाहणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सावंतवाडी वेंगुर्ले मालवण या तालुक्यातील ग्रंथालयांची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय तर्फे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र साहित्य मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झालेले जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव विठ्ठल कदम, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोकण विभागीय प्रतिनिधी भरत गावडे यांचा गौरव सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ. जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक सतीश गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालया गावात वीस वर्षांपूर्वी सुरू करणारे संस्थापक सचिव एडवोकेट संतोष सावंत यांची जिल्हा ग्रंथालय संघावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष माजी सरपंच अनिता नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सत्काराला बोलताना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागात कलंबिस्त सैनिकी परंपरा असलेल्या गावात गेली वीस वर्ष उत्तम प्रकारे ग्रंथालय चळवळ राबविण्यात येत आहे. याबद्दल सर्व संचालक मंडळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तालुकास्तरीय ग्रंथालय पाहणे अभियान मध्ये अनेक ग्रंथालय आज उत्तम प्रकारे गावागावात सुरू आहेत. ही चळवळ सामाजिक प्ररणेतून सुरू आहे. ज्या भागात ग्रंथालय चळवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशी ग्रंथालय आम्ही शोधून पुन्हा ती प्रवाहात आणण्यात येतील  त्यासाठी आम्ही निश्चितपणे जिल्हा ग्रंथालय संघ सर्वतोपरी अशा ग्रंथालयांना प्रोत्साहन देईल. तरी अशा ग्रंथालय च्या अध्यक्षांनी जिल्हा संघाकडे व तालुका प्रतिनिधीकडे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक एडवोकेट संतोष सावंत म्हणाले खरंतर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदावर संधी मिळाली. याचा सर्व श्रेणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व टीमला देतोच पण हा सन्मान खऱ्या अर्थाने माझ्या कलंबिस्त गावचा आहे. ज्या ग्रंथालयाच्या माध्यमातून मी साहित्य व ग्रंथालय चळवळीत काम करू शकलो त्या ग्रंथालयाचा सर्व संचालक मंडळ यांच्याच सहकार्यामुळे मी जिल्हा ग्रंथालय संघाचा संचालक होऊ शकलो आणि आज माझा सन्मान होतो आहे. हा सन्मान ग्रंथालयाचा आहे. असे ते म्हणाले.

यावेळी साहित्य मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झालेले विठ्ठल कदम, भरत गावडे, राजन पांचाळ आदिने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कलंबीस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रूप सावंत, उपाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, संस्थेचे सचिव अनिल उर्फ भाई सावंत, संचालक मीनल जंगम, ग्रंथपाल दीपा श्री जाधव. आधी उपस्थित होते.. सावंतवाडी तालुक्यात सांगेली, माजगाव, कुणकेरी, आंबोली, दानोली, मळगाव, वेर्ले माजगाव, सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर आदी ग्रंथालयांना भेटी देण्यात आली. यावेळी मळगाव ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर आधी संचालक मंडळ यांनीही उपस्थित जिल्हा ग्रंथालय संघाच्या टीम च्या उपक्रमाचे कौतुक केले.