Home स्टोरी जामा मशिदीच्या पायऱ्याखाली असलेली कृष्ण मुर्ती बाहेर येणार?

जामा मशिदीच्या पायऱ्याखाली असलेली कृष्ण मुर्ती बाहेर येणार?

178

१६ मे वार्ता: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील श्री कृष्णजन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टचे संरक्षक कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी मथुरेच्या केशवदेव मंदिरातील मूर्ती आग्राच्या शाही जामा मशिदीच्या पायऱ्यात गाडल्या गेल्याचे दावा केला आहे. त्यांनी या मुर्ती बाहेर काढण्यात याव्यात अशी देखील मागणी केली आहे. सध्या आग्रा येथील जामा मशीदीच्या पायऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून या पायऱ्या खोदण्यासाठी कथावाचक देवकीनंदन ठाकून यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातील याचिका कोर्टाने स्वीकारली आहे.

याप्रकरणी कोर्टाने उत्तर देण्याकरीता जामा मशिद इंतजामिया कमेटी, छोटी मशिद, दीवान ए खास, जहांआरा मशिद, आग्रा किल्ला, यूपी सेंट्रल वक्फ बोर्ड लखनऊ आणि श्रीकृष्ण सेवा संस्थान यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व पक्षांना ३१ मे पर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. जामा मशिदीच्या पायऱ्यांमध्ये भगवान कृष्णाच्या मुर्ती गाडण्यात आल्याचे या दाव्यामध्ये म्हटले आहे. या पायऱ्या खोदून मुर्ती बाहेर काढाव्यात. या संदर्भात सिव्हील कोर्टाने नोटीस बजावून सुनावणीसाठी ३१ मेची तारीख निश्चित केली आहे.