Home स्टोरी जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका जिल्ह्यातील उमेदवारांनी घेवू नये! शिक्षण मंत्री दिपक केसरकर….

जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका जिल्ह्यातील उमेदवारांनी घेवू नये! शिक्षण मंत्री दिपक केसरकर….

166

सावंतवाडी: – सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याबाबत काढण्यात आलेला “तो” आदेश मुलांचे नुकसान होवू नये यासाठी १ महिन्यापुरता आहे. त्यामुळे आता नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलसमाधी आंदोलनासारखी टोकाची भूमिका जिल्ह्यातील उमेदवारांनी घेवू नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे डी. एड, बी.एड उमेदवारांना केले. दरम्यान या आदेशात काही त्रुटी राहिल्यास त्याचा पुर्नविचार जाईल. संबंधित मागणी करणारे उमेदवार हे टीईडी परिक्षा पास नसल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे भविष्यात त्यात काही बदल करून सकारात्मक भूमिका घेता येवू शकते का…? याबाबत सुध्दा आमचा विचार सुरू आहे, असे ही केसरकर म्हणाले.

श्री. केसरकर यांनी आपल्या निवासी ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, औरगांबाद न्यायालयाने दिलेला “स्टे” आता उठला आहे. त्यामुळे राज्यात ५० हजाराहून अधिक शिक्षक भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, हा प्रश्न सुटणार आहे. दुसरीकडे निवृत्त शिक्षक नेमण्यात आल्यामुळे या ठिकाणी टिका केली जात आहे. परंतू ही नेमणूक ही एका महिन्यासाठी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवोदीत उमेदवार घ्यायचे झाल्यास त्यांची निवड प्रशिक्षण आदी गोष्टींसाठी वेळ झाला आहे. तसेच या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्यामुळे आम्ही निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय घेतला. त्यात कोणाचेही नुकसान होणार नाही. आता मागणी करणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी घेतले असते. परंतू त्यांनी आवश्यक असलेली टीईडी परिक्षा दिली नसल्याचे पुढे आले आहे. आता नव्याने भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारांनी प्रयत्न करावा.जलसमाधी आंदोलना सारखा टोकाचा निर्णय घेवू नये. मंत्री केसरकर पुढे म्हणाले, संकेश्वर कडुन येणारा महामार्ग हा मुळात संकेश्वर-रेडी असा मंजुर झाला होता. त्यामुळे रेडी पोर्ट आणि तेथील पंचतारांकित हॉटेल महामार्गाने जोडले जावे, यासाठी बांद्यासह दोन्हीकडे हा रस्ता जोडण्यात यावा, तसा प्रस्ताव आपण दिला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.अजित पवार व माझे कौटुंबिक संबंध आहेत. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे धावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शरद पवारांना वाकून नमस्कार केला. उध्दव ठाकरेंना हात जोडले तर त्यात गैर काय..? हा ज्याच्या-त्याच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे कोण टिका करीत असला तरी मला कमीपणा वाटणार नाही, असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी नियोजित संकेश्वर-बांदा मार्गाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, हा रस्ता रेडी पर्यंत मंजूर होता. मात्र त्यानंतर तो बांद्यात नेण्याचे ठरले. परंतू तुर्तास बांदा येथून एक महामार्ग गेला आहे. विकासाचा मुद्दा लक्षात घेता भविष्यात रेडी पोर्ट आणि पंचतारांकित हॉटेलकडे हा महामार्ग जाणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव आपण शासन दरबारी दिला असून त्याबाबत सकारात्मक भूमिका ठरविली असा आपल्याला विश्वास असल्याचे केसरकर म्हणाले.सुदैवाने जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करावा, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, असेही मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून किमान १०० कोटीचा निधी जिल्ह्यासाठी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मी शब्द टाकणार आहे. येणाऱ्या ६ महिन्याच्या काळात सिंधुदुर्गचा कायापालट झालेला दिसेल, , . त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. आज जी जिल्ह्यात विकासकामे होत आहेत. ती मी पालकमंत्री असताना आणलेल्या निधीतून होत आहेत. येणाऱ्या काळात सुध्दा मला जिल्ह्यात अनेक विकास कामे, प्रकल्प आणायचे आहेत. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुदैवाने माझ्यासह मंत्री उदय सामंत व रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्याला ३ मंत्रीपदे मिळाली आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे, तसे न झाल्यास येथील जनता आम्हाला कदापि माफ करणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.