१२ मे वार्ता: जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून आज शुक्रवारी दि.१२ रोजी पावनेदोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सदर घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.