सिंधुदुर्ग: चिवला बीच येथील अल्बर्ट कामिल फर्नांडिस यांच्या मासेमारी बोटीला आग लागून जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज मालवण दौऱ्यावर आ. वैभव नाईक गेले असता त्यांनी या बोटीची पाहणी केली. तसेच अल्बर्ट फर्नांडिस यांना आर्थिक मदत करत शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी बाबी जोगी, महेश जावकर, दीपा शिंदे, फ्रान्सिस फर्नांडिस, हेमंत मोंडकर,यशवंत गावकर,सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते.