सावंतवाडी प्रतिनिधी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज रविवार दि.३ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी आरपीडी हायस्कूल येथे भाजपच्या बुथ कार्यकारणी महासंमेलन साठी येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदार संघात कार्यकर्त्यांचे महासंमेलन होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे हे महासंमेलन आहे. या महासंमेलनासाठी मुख्यमंत्री श्री सावंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारीला हे महासंमेलन होणार होते. मात्र ते पुढे ढकलून तीन मार्चला आता आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात जवळपास ४००० हून अधिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली. सावंतवाडीत हे महासंमेलन होत आहे या महासभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महासंमेलना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री नारायण राणे व आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
Home स्टोरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांच्या महासंमेलनाला उपस्थित राहणार.