Home Uncategorized गोवा-बागा – कळंगुट येथे मतिमंद महिलेवरसामूहिक बलात्कार, ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपासात...

गोवा-बागा – कळंगुट येथे मतिमंद महिलेवरसामूहिक बलात्कार, ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपासात अडथळे…

54

गोवा: बागा-कळंगुट येथे एका मतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे समजते.या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी ६ अज्ञातांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १८ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी च्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हे प्रकरण पणजी महिला पोलीस विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडित महिलेच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला तिच्या एका मैत्रिणीसोबत गोव्यात फ़िरायला आली होती. मात्र त्या मैत्रिणीचा सद्यस्थितीत ठावठिकाणा नसल्याने तिचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शनिवार दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ६ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोवा मेडिकल कॉलेज मधील मानसोपचार तज्ञांसमोर बलात्कार झाल्याचे उघड करणाऱ्या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळे येत आहेत, त्या महिलेचा योग्य पद्धतीने जबाब घेण्यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे.