मसुरे प्रतिनिधी: पूर्ण प्राथमिक शाळा गुरामवाड नंबर २ व
प्रा शाळा कुमामे या दोन शाळात कै भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप रामचंद्र गुराम यानी दिलेल्या आर्थिक सहकार्यातून संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी दिलीप रामचंद्र गुराम यानी दिलेल्या
देणगीमुळे या स्पर्धा संपन्न झाल्या. त्यांचे
आभार मानले हस्ताक्षर, वक्तृत्व, रंगभरण, बडबड गीत, वाचन या विविध स्पर्धामध्ये दोन शाळातील ६३ विद्यार्थी सहभागी झाले त्यातील सर्व स्पर्धकाना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकाना प्रशस्ती पत्र व भेटवस्तू वितरीत करण्यात आली.
गुरामवाडी नं २ चे शिक्षक परमानंद वेंगुर्लेकर यांनी सेवांगणचे नेहमीच विविध उपक्रम असतात. या वेळी आमच्या शाळेची निवड केल्याबद्दल सेवांगणचे व त्यास सहकार्य करणारे दिलीप रामचंद्र गुराम यांचे आभार मानले. कुमामे शाळेचे शिक्षक श्री खिलारे गुरुजी यानी सुद्धा दिलीप रामचंद्र गुराम यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास सेवांगणचे बाळकृष्ण गौधळी व ग्रंथपाल जांभवडेकर मॅडम यानीही नियोजनात सहकार्य केले.
या कार्यक्रमास सेवांगणचे अध्यक्ष बापू तळावडेकर, विश्वस्त दीपक भोगटे, विवेक म्हाडगुत, गुरामवाड नं २ च्या मुख्याध्यापिका वेदीका दळवी, नेहा गवाणकर, स्वाती राठोड, भिवा गोठणकर, कुमामेचे सहशिक्षक खिलारे सर व विद्यार्थी उपस्थित होते.