Home स्टोरी गोळवण ग्रामपंचायतच्या वतीने भरड धान्य नाचणीचे वाटप!

गोळवण ग्रामपंचायतच्या वतीने भरड धान्य नाचणीचे वाटप!

176

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): गोळवण- कुमामे- डीकवल ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे सरपंच श्री.सुभाष लाड यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत भरड धान्य म्हणून नाचणीचे वाटप सुमारे १०० शेतकऱ्यांना करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मार्फत भाजी बियाणे किटपचे वाटप करण्यात आले. सदर सभेत स्वच्छ्ता विषयक चर्चा करण्यात आली.

यावेळी उपसरपंच श्री.साबाजी गावडे ,ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, ग्रामसेविका शेलटकर मॅडम,कृषी सहाय्यक श्री.सौंगडे ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका तसेच गावातील सुमारे दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी फक्त १ रुपयात मिळणाऱ्या शेतकरी विम्याची माहिती देण्यात आली.