Home स्टोरी गेले चार महिने दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी पेन्शन सेवा खंडित !...

गेले चार महिने दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी पेन्शन सेवा खंडित ! ..

203

सावंतवाडी प्रतिनिधी: दिव्यांग, निराधार, विधवा लाभार्थी यांना शासनाकडून मिळणारे पेन्शन मदत गेले तीन-चार महिने मिळालीच नाही. अवघी तुटपुंजी जी असलेली ही पेन्शन या दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना वेळेत मिळतच नाही. ही पेन्शन कधी मिळणार या प्रतीक्षेत हे बांधव आहेत. त्यामुळे आम्हाला वेळेत पेन्शन द्या. आता दिवाळी तोंडावर आली आहे. आता दिवाळीच्या पूर्वी तरीही पेन्शन आम्हाला मिळेल का ? आणि ती शासनाने द्यावी. अशा मागणीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा दिव्यांग सेल चे अध्यक्ष  बाबा पास्ते व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सेल अध्यक्ष स्वप्नील लातये यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील सर्वच दिव्यांग निराधार विधवा लाभार्थ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते. ही पेन्शन जून पासून आजतागायत मिळालेलीच नाही. यावर आमची गणेश चतुर्थी उत्सवही पेन्शन शिवाय गेला आहे. आता दिवाळी तोंडावर आली आहे. आता दिवाळी पूर्वी तरी आमची चार महिने राहिलेली पेन्शन आमच्या हाती द्या. अन्यथा आम्हाला दिव्यांग बांधवांना रस्त्यावर उतरावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.