Home स्टोरी गीता जयंती विश्वभर साजरी केली पाहिजे – गोविंद गोवेकर.

गीता जयंती विश्वभर साजरी केली पाहिजे – गोविंद गोवेकर.

186

पणजी: परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज हळदोणातर्फे गीता जयंती उत्सव श्री रवाळघाडी देवस्थान जयदेववाडा येथे गीतेचा बारावा अध्याय पठण करून साजरा करण्यात आला.

 

यावेळी शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गोविंद गोवेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि, आज गीता जयंती आहे, हा दिवस सगळ्या हिंदूंनी विश्वभर साजरा केला पाहिजे. महाभारताच्या वेळी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे दैवी ज्ञान दिले. तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. गीतेमध्ये जीवनाचा संपूर्ण सार सांगितले आहे.

 

यावेळी संत समाज हळदोण्याचे अध्यक्ष श्री. सविदास नाईक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. गीतेचे सर्वांनी लहानपणापासून पठण करावे जेणेकरून आपल्याला जीवनाचा सार कळेल. तसेच आपली भावी पिढी सुसंस्कारित होईल.

या कार्यक्रमाला शिवराज्य प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत साळगावकर, देवस्थानाचे सचिव दर्शन साळगावकर, सौ. श्वेता नाईक, सौ. वंदना नाईक व बालगोपाळ मंडळी उपस्थित होते.