Home स्टोरी गाझा शहरातील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ५०० लोकं ठार.

गाझा शहरातील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ५०० लोकं ठार.

141

देश विदेश: गाझा शहरातील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात रुग्णालयात आश्रय घेत असलेले किमान ५०० लोकं ठार झाले आहेत. या घटनेचा हमासने वॉर क्राईम असा उल्लेख करत जगातील देशांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर इस्रायलने तो हल्ला आपण केलेला नसून हमासनेच ऱॉकेट डागल्याचे म्हटले आहे.  इस्रायल-हमास युद्धाच्या ११ व्या दिवशीही दक्षिण गाझामध्ये तीव्र बॉम्बवर्षाव सुरूच आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाझातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे हजारो लोक रफाह येथे जमले आहेत. तेथून इजिप्तला जाणारा मार्ग आहे. परदेशी पासपोर्ट असलेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मध्यस्थ करारासाठी दबाव आणत आहेत.