Home स्टोरी गांधीजींच्‍या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्‍याचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश...

गांधीजींच्‍या अवमान याचिकेतून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्‍याचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश !

170

८ ऑगस्ट वार्ता: गांधीजींचा अवमान केल्‍याप्रकरणी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे नाव याचिकेतून वगळण्‍याचा महात्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्‍तर्षी यांनी पू. भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात न्‍यायालयात प्रविष्‍ट केलेल्‍या याचिकेवर ७ ऑगस्‍ट या दिवशी सुनावणी झाली.यावर याचिकाकर्त्‍यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी याचिकाकर्ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यावर ठाम असून याविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात जाणार असल्‍याचे म्‍हटले. महापुरुषांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍य रोखण्‍यासाठी एखादा कायदा केला जावा, तसेच भारतीय दंड विधानातील मानहानीच्‍या विरोधातील कलमे ४९९ आणि ५०० यांचा उपयोग होणार नसेल, तर ती रहित करावीत, अशी मागणी कुमार सप्‍तर्षी यांनी याचिकेत केली आहे. याची नोंद घेऊन याविषयी सविस्‍तर उत्तर सादर करण्‍याचे निर्देश न्‍यायालयाने राज्‍य सरकारला दिले आहेत, तसेच अशा प्रकारच्‍या समस्‍यांना सामोरे जाण्‍यासाठी न्‍यायालयीन मित्र (अ‍ॅमिक्‍युरी) नियुक्‍त करण्‍याचा निर्णय न्‍यायालयाने घेतला आहे. *केवळ संभाजी भिडे यांच्‍या विरोधात का ? – न्‍यायालयाचा प्रश्‍न*‘महापुरुषांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये केल्‍याची अनेक प्रकरणे असतांना केवळ संभाजी भिडे यांच्‍या विरोधात जनहित याचिका का ?’ असा प्रश्‍नही या वेळी मुख्‍य न्‍यायमूर्ती देवेंद्र उपाध्‍याय यांनी उपस्‍थित केला. ‘महापुरुषांविषयी अवमानकारक वक्‍तव्‍याच्‍या विरोधात जनहित याचिका प्रविष्‍ट होऊ शकते; परंतु जनहित याचिका केवळ एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या विरोधात प्रविष्‍ट होऊ शकत नाही’, असे या वेळी न्‍यायालयाने म्‍हटले.