Home स्टोरी गणेश चतुर्थी निमित्त कोकणात “झिम पोरी झिम” अशा अनेक गीतांवर महिला ताल...

गणेश चतुर्थी निमित्त कोकणात “झिम पोरी झिम” अशा अनेक गीतांवर महिला ताल धरत पारंपारिक फुगडी खेळात दंग.

389

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणात आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात वाड्यावाड्यात भजनांचे मेळ भरले जातात वैष्णवांचा हा मेळा म्हणजे जणू गणरायाला नमन होय. त्यात आज महिला कुठेहि कमी नाहीत हे दिसून येत आहे. महिला वर्ग सध्या जिल्ह्यात फुगडी चा ताल धरत आहे. मोबाईल जमान्यात सध्या अनेक पारंपरिक प्रकार कमी होत आहेत की काय? असे वाटत असतानाच गणेश चतुर्थीच्या या कालावधीत जशी भजन गावागावात सुरू आहेत. त्या पद्धतीने महिला वर्ग ही आता फुगडीचा ठेका धरताना पाहायला मिळत आहेत.

कोकणातील पारंपरिक फुगडी हा महिलांचा आवडता प्रकार आहे. आता फुगडीच्या वेगळ्या तालावर आणि वेगळ्या ढंगात तरुणी आणि वयोवृद्ध महिलाही ठेका धरताना पाहायला मिळत आहेत. सह्याद्री पट्ट्यातील सैनिकांची परंपरा असलेल्या कलंबिस्त शिरसिंगे, वेर्ले, आंबोली, चौकुळ, सांगेली, देवसु या भागात आणि विशेषता सावंतवाडी शहर व दोडामार्ग भागात गावागावात फुगडी खेळ रंगत आहेत. 

गणेश चतुर्थी निमित्त कोकणात “झिम पोरी झिम” अशा अनेक गीतांवर महिला ताल धरत पारंपारिक फुगडी खेळात दंग होत आहेत. तसेच कोकणात अनेक ठिकाणी पारंपारिक फुगडीच्या स्पर्धा हि आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय व आनंदी आनंद असं वातावरण बघायला मिळत आहे.