Home स्टोरी गणित प्राविण्यमध्ये कु. जतीन पाटीलचे घवघवीत यश !

गणित प्राविण्यमध्ये कु. जतीन पाटीलचे घवघवीत यश !

89

सावंतवाडी प्रतिनिधी: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे चा विद्यार्थी कु. जतीन संजय पाटील याने गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र ठरला आहे. या यशाबद्दल शाळेच्या संचालिका श्रीमती मैथिली मनोज नाईक यांनी कु. जतीन संजय पाटील याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजय बांदेकर यांनी पुढे होणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी कु. जतीन पाटील याला शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी गणित विषयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रद्धा पायनाईक व इतर सहकारी शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.