Home स्टोरी खासदार विनायक राऊत यांना अटक?

खासदार विनायक राऊत यांना अटक?

120

रत्नागिरी: (वार्ता २८ एप्रिल): रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीच्या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. बारसुच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखलं आहे. बारसूमधील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. गावकऱ्यांचे हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करत आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता. तसेच पोलिसांचा फौजफाटा मागे घेण्याचीही त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनातही सहभागी झाले. पण आज त्यांना अटक करण्यात आली आहे.