Home राजकारण खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप

87

२७ मे वार्ता: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले, की भाजप, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्र पणाने वागत होती, आणि शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा कट होता म्हणून शिवसेना भाजप पासून वेगळी झाली. भाजप पक्ष हा मगर, अजगर आहे, आत्ता पर्यत जे जे त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांनी त्यांनी खाऊन टाकलं आहे. आता शिंदे गटाला अनुभव येत आहे. आता त्यांनी कळेल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. तर शिंदेंच्या शिवसेनेत पडलेल्या गटावर बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे असलेल्या महितीनुसार शिंदे गटामध्ये नाराजी आहे, आणि त्या गटामध्ये दोन गट पडले आहेत. मात्र गजानन किर्तीकर यांनी सांगितलं तिच भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून होती. त्यामुळे आम्ही भाजप पासून दूर गेलो, त्यांनी शब्द पाळले नाहीत, निधी मिळवून दिला नाही, शिवसेनेच्या आमदारांची कामे कारत नाहीत, शिवसनेच्या प्रमुख नेत्याचा अपमान केला असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.