Home स्टोरी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ?

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ?

114

महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्षात बंडखोरी झाली आणि सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदे- ठाकरे गटाकडून सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकवेळा खोचक शब्दात टीका केली आहे. दरम्यान याच टिकेवरून संजय राऊत यांना छत्रपती संभाजीनगरचे अमर विनायक लोखंडे यांनी १०० कोटींच्या मानहानीची नोटिस आपल्या वकिलामार्फत पाठवली आहे. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत संजय राऊत यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात चाटुगिरीचे वक्तव्य केल्याने समाजात त्यांचा अवमान झाल्याचा आरोप देखील लोखंडे यांनी या नोटीसमध्ये केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा नोटीस पाठवणारे अमर लोखंडे यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.