Home स्टोरी खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी!

खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी!

109

२२ ऑगस्ट वार्ता: खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्याने नवनीत राणा यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 088055 41949 संपर्क क्रमांकावरून कोणीतरी विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने तिवसामधून मी बोलतो आहे असं सांगितलं. तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधर चाकुने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही. तसेच फोनवर अश्लील शिवीगाळ करुन खालच्या भाषेचा वापर केला, असंही नवनीत राणांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी करावीय. तसेच त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलीये. राजापेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.