सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोरोनाबाबत काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने दिलासा दिला होता. दरम्यान याच डब्ल्यूएचओने आता आणखी एका आजाराबाबत अलर्ट जारी केला आहे. एक असा आजार येणार आहे, जो कोरोनापेक्षाही महाभयंकर असेल. या आजारासाठी तयार राहा, असा सल्ला WHO ने संपूर्ण जगाला दिला आहे.
कोरोना महासाथ आता आरोग्य आणीबाणी नसल्याचं काही दिवसांपूर्वी WHO ने जाहीर केलं होतं. आता डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये हेल्थ मीटिंगमध्ये चर्चा केली.या बैठकीत डॉ. ट्रेडोस यांनी नव्या महासाथीबाबत सावध केलं आहे. डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले, कोरोना जगभरातील २० दशलक्ष लोकांनी आपला जीव गमावला. कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही. आता तो नव्या रूपात लोकांसाठी खतरनाक ठरू शकतो. कोरोना आता हेल्थ एमर्जन्सी नाही पण आपण पुढच्या महासाथीला रोखण्यासाठी चर्चा करायला हवी.
हा नवा आजार, नवी महासाथ कोरोनापेक्षाही महाभयंकर असू शकते त्यामुळे तिचा सक्षमरित्या प्रतिकार करण्यसासाठी आपण तयार राहायला हवं. कोरोनाबाबत WHO चा दिलासा कोविड संदर्भात मोठी घोषणा करताना डब्ल्यूएचओने सांगितले की, कोविड-19 ही आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही. याबाबतचा निर्णय आपत्कालीन समितीच्या 15 व्या बैठकीत घेण्यात आला. डब्ल्यूएचओने सांगितलं की, 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती.गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना संसर्गाला वगळ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 जागतिक आरोग्य आणीबाणी संपली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोविड-19 हा जागतिक आरोग्यासाठी संपला आहे, असंही डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे.