Home स्टोरी ‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ३ युद्धनौकांचे जलावतरण….!

‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ३ युद्धनौकांचे जलावतरण….!

109

६ डिसेंबर वार्ता: ‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ‘मालवण’, ‘मंगरोल’ आणि ‘माहे’ या ३ युद्धनौकांचे नुकतेच जलावतारण झाले. विविध शस्त्रास्त्रांनी सिद्ध असलेल्या या पाणबुडीविरोधी युद्धनौका आहेत. ‘मालवण’चे जलावतरण नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस अँडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते, ‘मंगरोल’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस अँडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते, तर ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस अँडमिरल पुनित बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले. समुद्रकिनारी असलेल्या शहरांची नावे या तिन्ही युद्धनौकांची दिली आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.