Home स्टोरी कोकणात चित्रीकरण झालेल्या संभ्रम या वेब सीरिज चा नुकताच फर्स्ट लूक टिझर...

कोकणात चित्रीकरण झालेल्या संभ्रम या वेब सीरिज चा नुकताच फर्स्ट लूक टिझर प्रदर्शित!

246

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: S.R.Y Film Production ची ही निर्मिती असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टिझर मधे, खून की आत्महत्या? अशी विचारात टाकणारी एक लाईन दिसून येते. एक खून आणि ४ संशयित , आणि त्या खुनाचा तपास करणारे पोलिस हे सगळ या टिझर मधून दिसून येत. एकूणच या टिझर वरून यामधील कलाकार आणि त्यांनी साकारलेली भूमिका दमदार दिसत असून या सीरिज ची कथा पण नक्कीच दमदार असेल.

नुकताच प्रदर्शित झालेला हा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, निर्माता आनंद मिस्त्री, दिग्दर्शक सागर गोसावी, लेखक रमेश भेकट, संकेत गोसावी, राम साबळे, तानाजी रावते आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने बनवलेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या किती पसंतीस येते हे बघावं लागेल…