Home स्टोरी कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट!

कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट!

118

२७ जुलै वार्ता: राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस चालू झाला आहे. २७ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ (अतीमुसळधार पाऊस) देण्यात आला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, येत्या ४-५ दिवस पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.