Home स्टोरी कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना. धो....

कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली!

337

सावंतवाडी प्रतिनिधी: रानकवी साहित्यिक ना. धो. महानोर यांना कोकणातील सावंतवाडीतील सुंदर वाडी अनुभवायची होती, पाहायची होती, पण हे त्यांचे स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. त्यांनी सर्वप्रथम माजी आमदार जयानंद मटकर यांच्याकडे ही इच्छा कित्येक वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती. आणि त्यानंतर आत्ता आत्ता अनेक साहित्यिक कवींकडेही त्याने मला सुंदरवाडी पाहायची आहे. असं बोलूनही दाखवलं होतं. एवढं सुंदरवाडी वरचे प्रेम एका महान कवी साहित्यिकाला होते. त्यांच्या जाण्याने केवळ निसर्गच पोरका झाला आहे नव्हे तर अवघी मानवताच पोरकी झाली आहे. अशा शब्दात इतिहासकार साहित्यिक जी. ए. बुवा यांनी शोक व्यक्त केला. सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

रानकवी ना. धो. महानोर

यावेळी गणित तज्ञ लेखिका मंगलाताई नारळीकर, निर्माते दिग्दर्शक नितीन देसाई, माजी खासदार तथा साहित्यिक ॲड बापूसाहेब परुळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हॉटेल पल येते कवी महानोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घेतलेल्या शोकसभेत श्री बुवा पुढे म्हणाले की, गीतकार रानकवी साहित्यिक राज्यकर्ते आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे निसर्गावर अफाट प्रेम असणारे कवी महानोर यांचं सावंतवाडी सुंदरवाडी नातं वेगळंच होतं. त्यांनी विधानसभेत आमदार असताना त्यांचे सहकारी आमदार माजी आमदार दयानंद मटकर यांच्याकडे मला सावंतवाडीची सुंदरवाडी पाहायची आहे, अनुभवायची आहे, असं बोलून दाखवलं होतं. पण त्यांना सुंदरवाडी सावंतवाडीत येण्याचा योग कधी आला नाही. मात्र ही त्यांची सुंदरवाडी पाहण्याची प्रखर इच्छा आज तागायत होती. त्यानी तसं अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. आतापर्यंत काल-परवापर्यंत त्यांना सुंदरवाडी पाहायची होती पण त्यांचं हे स्वप्न आणि त्यांचे सुंदर वाडीवरचं प्रेम अधुरच राहिलं. अशा महान साहित्यिकाराचे सुंदरवाडी वरचे प्रेम ऐकून खरंच आपण सर्वजण या सुंदर वाडीतले धन्य आहोत. त्यांच्या जाण्याने मानवताच पोरकी झाली आहे.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी शेतीशी मातीशी नाळ असलेले साहित्यिक कवी महानोर यांच्या जाण्याने साहित्य चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य निघावे, कोणती पुण्य अशी येथील फळाला आणि माझ्या पापणीला पूर यावे! अशा शब्दात शोक व्यक्त केला. यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार भरत गावडे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, तालुका सहसचिव राजू तावडे, सदस्य प्राध्यापक रुपेश पाटील, शंकर प्रभू यांनी एक महान साहित्यिक राजकर्ते आणि ज्यांना शेतीबद्दल अफाट प्रेम होते, असे कवी महानोर यांनी साहित्य चळवळ जिवंत ठेवली ते एक महान साहित्यिकच नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी जो त्याग दिला तो खरच महान आहे. अशा शब्दात शोक व्यक्त केला.

यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, मेघना राऊळ, रामदास पारकर, प्रदीप प्रियोळकर, बालकवी मनोहर परब, विनायक गावस आदी उपस्थित होते. यावेळी साहित्य क्षेत्रातील प्रेमी उपस्थित होते.

फोटो: सावंतवाडी कवी ना. धो. महानोर यांना शोकसभेत श्रद्धांजली वाहताना प्रा. जी.ए. बुवा, तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, बाजूला राजू तावडे, भरत गावडे, विठ्ठल कदम, मनोहर परब, रुपेश पाटील, अभिमन्यू लोंढे, प्रदीप प्रियोळकर, मेघना राऊळ, विनायक गावस, शंकर प्रभू, रामदास पारकर आधी…