Home स्टोरी कोकण पदवीधर मतदार यादीत आतापर्यंत १५,१५४ मतदारांची नोंदणी. ९ डिसेंबर पर्यंत नवीन...

कोकण पदवीधर मतदार यादीत आतापर्यंत १५,१५४ मतदारांची नोंदणी. ९ डिसेंबर पर्यंत नवीन नोंदणी करण्यास संधी. जिल्हाधिकारी किशोर तावडे

145

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी झालेल्या मतदारांची प्रारूप यादी जिल्हा निवडणूक कार्यालयाने जाहीर केली आहे. मागच्या यादीच्या तुलनेत या मतदारांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. तब्बल १५,१५४ पदविधर मतदारांची नोंदणी झाली आहे . त्याची प्रारूप यादी जाहीर केली असून त्यात हरकती व सूचनांची मुदत 9 डिसेंबर पर्यंत आहे. याच कालावधीत म्हणजे आता 9 डिसेंबर पर्यंत शिल्लक राहिलेल्या पदवीधर मतदारांना नवीन मतदार नोंदणी करण्यास संधी आहे. तरी शिल्लक राहिलेल्या पदवीधर मतदारानी आपले नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केली आहे.

23 नोव्हेंबर 2023 हे कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी मुदत होती. या मुदतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9038 पुरुष पदवीधर मतदारानी 6116 स्त्री पदवीधर मतदारानी असे एकूण 15,154 मतदारानी मतदार म्हणून नाव नोंदणी केली होती. या सर्व मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून या यादीत नावातील काही चुका असतील किंवा आक्षेप व हरकती असतील तर ते दुरुस्त करण्यास 9 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. असेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी स्पष्ट केले.

याच मुद्दतीत म्हणजे 9 डिसेंबर पर्यंत नवीन मतदारांनाही आपली नाव नोंदणी करता येणार आहे. कुडाळ कणकवली व सावंतवाडी येथील महसूल उपविभाग कार्यालय किंवा प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार ऑफिस मध्ये ही नाव नोंदणी केली जात असून शिल्लक राहिलेल्या पदवीधर मतदारांनी आपले मतदार नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.1 नोव्हेंबर 2020 पर्यंत पदवी अथवा पदविका पूर्ण केलेल्या पदवीधर नागरिकांना या मतदार यादीत आपले नाव नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये अशा पात्र नागरिकांनी आपले पदवी अथवा पदविकेचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक घेऊन जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून सत्यप्रत करून घ्यावी व मतदार नोंदणी फॉर्म भरून द्यावा. यासाठी नागरिकांनी पदविका किंवा पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आपल्या निवडणूक मतदान ओळखपत्रावरील नोंदणी क्रमांक व आधार कार्ड ची माहिती द्यावी. पदविका प्रमाणपत्र धारकांना मतदार नोंदणी करता येणार आहे मात्र कोणत्या पदविका यात समाविष्ट आहेत याची यादी निवडणूक विभागाकडून येताच ते तहसीलदार कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती ही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे उपस्थित होते