Home स्टोरी कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने निगुडे जि. प. नं....

कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने निगुडे जि. प. नं. १ च्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

74

बांदा प्रतिनिधी: सोमवार दि.२४ जून २०२४  रोजी शाळेचे माजी विद्यार्थी व निगुडे गावचे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नातून व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या सौजन्याने शाळेतील दहा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना SCHOOL KIT (शैक्षणिक साहित्य) वितरित करण्यात आले. या प्रसंगी सेवेक्स टेकनोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे ब्रँच मॅनेजर श्री सुनिल मोरे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर प्रथमेश सावंत व सावंतवाडी तालुका समन्वयक भगवान चव्हाण उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग होंडे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर प्रथमेश सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की,  खरोखर या निगुडे शाळेमध्ये विद्यार्थी हे शिस्तबद्ध मान्यवर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत खरोखर कौतुकास्पद होतं.  तसेच निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनीही कोकण कला शिक्षण संस्था यांचे आभार व्यक्त करत म्हणाले, हे दुसरे वर्ष असून कोकण कला शिक्षण संस्थेनी केलेले हे शैक्षणिक साहित्य गावातील गरीब, होतकरू गरजू विद्यार्थी यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार. गेल्या दोन वर्षांतील विद्यार्थी यांची शिक्षणातील कामगिरी सुध्दा चांगली आहे. विविध स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेणे याचे सर्व श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर व सर्व शिक्षकांचे आहे. मुख्याध्यापिका  गौरवी पेडणेकर यांनीही संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. असच सहकार्य आपण करावे ही विनंती व आपल्या संस्थेच नाव अजून नावलौकिक व्हावे असे आम्ही सर्वजण प्रार्थना करतो.

यावेळी कार्यक्रमाची सांगता पदवीधर शिक्षक नारायण नाईक यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सेवेक्स टेकनोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे ब्रँच मॅनेजर सुनिल मोरे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर प्रथमेश सावंत व सावंतवाडी तालुका समन्वयक भगवान चव्हाण, मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर, पदवीधर शिक्षक नारायण नाईक, रूपाली नेवगी, पांडुरंग होंडे आदी व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.