Home स्टोरी कै. प्रा. काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले! वामन...

कै. प्रा. काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले! वामन कविटकर

133

सावंतवाडी प्रतिनिधी: कै. प्रा. काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले. जिवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या सर्वसमावेशक सक्षम नेतृत्वामुळेच ओटवण्यासारख्या ग्रामीण भागात २७ वर्षांपूर्वी माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवणे हीच काकांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे असे प्रतिपादन ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर यांनी केले

ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै प्रा. मनोहर ऊर्फ काका दामले यांच्या १९ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात वामन कविटकर बोलत होते. यावेळी ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, कोषाध्यक्ष मनोहर मयेकर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षिका संजीवनी गवस, एकनाथ घोंगडे, एन व्हि राऊळ, पी एम कांबळे, मंगेश गावकर, शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत, शंकर बिरोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनीही काका दामले यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राजाराम वर्णेकर आणि मनोहर मयेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी काका दामले यांना आदरांजली वाहिली.